शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महावितरणचे पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:05 AM2019-01-18T00:05:27+5:302019-01-18T00:05:47+5:30

राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला

 Portal of Mahavitaran for farmers' facilities | शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महावितरणचे पोर्टल

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महावितरणचे पोर्टल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला
शेतकºयांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या उद्देशाने महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे उर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. तसेच या पोर्टलद्वारे शेतकºयांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, आॅनलाईनद्वारे शेतकºयांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकºयांकडून नेहमी विचारण्यात येणाºया प्रश्नांची माहिती, मराठी व इंग्रजी या भाषेतील आॅडिओ-व्हीडीओ उपलब्ध असणार आहेत.
तसेच या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून दिली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकºयांच्या वीजबिलांचा खर्चही वाचेल. शेतकºयांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता इलेक्ट्रिक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकºयांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हिंस्त्र पशु, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होणार आहे.

Web Title:  Portal of Mahavitaran for farmers' facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.