मराठवाडा मुक्तीलढ्यातील कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती भव्य रांगोळीत साकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 02:05 PM2024-09-17T14:05:06+5:302024-09-17T14:06:39+5:30

आखाडा बाळापुरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असाही साजरा; रांगोळीतून मराठवाड्या मुक्ती लढ्यातील सैनिकांना मानवंदना

Portrait of 52 freedom fighters from Kalmanuri taluk of Marathwada Muktildha was made in grand rangoli. | मराठवाडा मुक्तीलढ्यातील कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती भव्य रांगोळीत साकारली

मराठवाडा मुक्तीलढ्यातील कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती भव्य रांगोळीत साकारली

- रमेश कदम

आखाडा बाळापूर ( हिंगोली ): मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्यातल्या त्यात कळमनुरी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. आज 76 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आखाडा बाळापूर येथे या स्वातंत्र्य सैनिकांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे. बाळापुर येथील चित्रकार दिलीप दारव्हेकर यांच्या  यांच्या 'दारव्हेकर कला अकादमी ' येथे भव्य रांगोळी रांगोळी रेखाटली आहे. यात कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्य सैनिकांची चित्रकृती साकारली आहे. रांगोळीच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती लढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेली ही आगळीवेगळी मानवंदना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन अर्थात मराठवाडा मुक्तीलढा आज मराठवाडाभर  विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 76 व्या या मुक्ती लढ्या निमित्त आखाडा बाळापूर येथील दारव्हेकर कला अकादमीत भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीत कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती रेखाटण्यात आली आहे. चित्रकार तथा कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर त्यांचे चिरंजीव शिवार्थ दारव्हेकर व सौभाग्यवती सौ. दारव्हेकर यांनी ही भव्य रांगोळी साकारली आहे. कळमनुरी तालुक्यातील तब्बल 52 स्वातंत्र्यसैनिकांचा सुवर्ण इतिहास या निमित्ताने रेखाटण्यात आला आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अशा पद्धतीने कलेच्या माध्यमातून मुक्ती लढ्याचा इतिहास मांडल्यामुळे कला, संस्कृती आणि इतिहासाचे अनोखे दर्शन बाळापुरात घडून येत आहे.

कळमनुरी तालुक्यातील या 52 स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती रांगोळीतून साकारली आहे....

शेंबाळपिंपरी सरहद्द कॅम्प प्रमुख दीपाजी शिवरामजी पाटील दाती,
प्रतापराव सोमजी देशमुख किल्ले वडगाव, 
नागोराव शेकुराव नाईक वाकोडी,
एकोजी बहिर्जी लुगडे साळवा,
ज्ञानोबा माधवराव तवर पिंपरी बु.,
नागोराव शेकुराव नाईक वाकोडी,
लोडबा राघोजी अडाणी वाकोडी,
बाबाराव जळबाराव बोंढारे बाळापूर,
भगवानराव बापूजी करंडे साळवा, माधवराव नारायणराव देशमुख घोडा, लिंबाजी हारजी दाती,
बापूराव जयराम पेंटर नांदापूरकर,
आनंदराव रुस्तुमराव पतंगे दिग्रस,
तुकाराम नागोजी वाघमारे दाती,
रामा नागोबा सूर्यवंशी दाती, 
चंपतराव गणपतराव पतंगे डिग्रस,
पिराजी व्यंकोबा तेली कुर्तडी,
विठ्ठल आबाजी पिनकरे वाकोडी, 
बापूराव गंगाराम भोपे खरवड,
कुंडलिकराव हरजी वानखेडे दाती,
नागोराव शेकुराव नाईक वाकोडी,
किशनराव बापूराव पतंगे येलकी,
परसराम तुकाराम कंकाळे डोंगरकडा,
प्रतापराव सोमजी देशमुख किल्लेवडगाव,
गंगाराम हनगु पतंगे येहळेगाव तु.,
 माधवराव दाजीबा मोरे कुपटी,
राजाराम राघोजी करंडे साळवा,
विठ्ठलराव चंपतराव नाईक चिंचोर्डी, विठ्ठलराव भुजंगराव पतंगे येलकी, गोदाजीराव नागोराव देशमुख जांब,
*हुतात्मा राजाभाऊ गोपाळराव वाकोडी,
रामा नागोबा सूर्यवंशी दाती, 
ग्यानबाराव रुस्तुमराव पतंगे कोंढुर, 
नागोराव हनुमंतराव सावंत शेवाळा,
 ग्यानबाराव गंगाराम सूर्यवंशी दाती,
शंकरराव बाबाराव घाडे पिंपरी खु.,
*शेंबाळेश्वर संस्थान महंत सैनिकांना अन्नपुरवठा करणारे,
भीमराव संभाजी बोंढारे बाळापूर,
नारायण शिवराम पतंगे डिग्रस, 
देवराव नागोजी सूर्यवंशी शेवाळा,
रामभाऊ सदाशिव सूर्यवंशी शेवाळा,
बाबुराव माधवराव शिंदे आडा,
मोतीराव गुणाजी लकडे घोडा,
 देविदास द्वारकोजी बागले किल्लेवडगाव,
शेख नजीब शेख नासर कांडली,
चांदोजी दुलाजी उपरे कृष्णापुर 
गोविंद राजेश्वर पाध्ये घोडा का. 
मुंजाजी माधव ठेगळे घोडा,
माणिकराव राधोजी धांडे पिंपरी खु.,
भागजी तुकाराम काळे येळेगाव तु.,
खंडेराव शिवरामजी सूर्यवंशी दाती, 
संभाजी उर्फ खोमाजी दाती.
 

Web Title: Portrait of 52 freedom fighters from Kalmanuri taluk of Marathwada Muktildha was made in grand rangoli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.