कोरोना महामारीतही डाक कर्मचारी देताहेत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:36+5:302021-04-27T04:30:36+5:30
हिंगोली जिल्हा मुख्य डाकघरअंतर्गत गोरेगाव, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत आदी जवळपास सहा ते सात कार्यालयांतील पोस्टमन, ...
हिंगोली जिल्हा मुख्य डाकघरअंतर्गत गोरेगाव, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत आदी जवळपास सहा ते सात कार्यालयांतील पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, ब्रँच पोस्ट मास्टर, १९ ब्रँच ऑफीसर जीवाची पर्वा न करता केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत आहेत.
कर्मचाऱ्यांची कार्यालयातर्फे घेतली जाते काळजी
कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ मुख्य डाक कार्यालयाच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप नित्याने केले जाते. एवढेच काय त्यांना वेळोवेळी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचनाही दिल्या जातात. पत्र वा इतर टपाल नागरिकांना घरपोच करायचे झाल्यास सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावूनच हा पत्र व्यवहार करावा, असेही सांगितले जाते.
-प्रकाश वाघमारे, पोस्ट मास्टर, मुख्य डाक घर, हिंगोली