पदस्थापना समुपदेशनाने जिल्हास्तरावरून ‘द्याव्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:15 AM2018-10-02T01:15:38+5:302018-10-02T01:15:53+5:30
विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे निवेदन सादर केले.
जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवी वर्गासाठी पदवीधर विषय शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून ही कामेही आता अंतिप टप्यात आली आहेत. त्यामुळे विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हास्तरावरून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जि. प. मे २०१३ मध्ये १२० शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हास्तरावरून पदस्थापना देऊन एकाही शिक्षकाची गैरसोय होऊ दिली नव्हती. सर्व प्रकारच्या पोस्टींग समुपदेशानाने देण्याची पद्धत मागील अनेक वर्षांपासून आहे. पभरणी व औरंबाद जिल्ह्यातही याप्रकारेच प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे समुपदेशनाने पोस्टींग मिळाल्यास शिक्षकांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल. त्यामुळे पदवीधर विषय शिक्षक पदस्थापना या १० आॅक्टोबर पूर्वी समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी केली. उपोषणाचा इशाराही समितीने दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या करू असे आश्वासनही शिक्षणधिकारी सोनटक्के यांनी दिले आहे. निवेदनावर पंडितराव नागरगोजे, सुभाष जिरवणकर, श्रीराम महाजन, विजय राठोड, संतोष दराडे, दिलीप जैस्वाल, जेजेराम बदणे, गडप्पा, प्रदीप राठोड, किरण राठोड, अन्नापुरे, एस. टी. तरडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.