वळणरस्त्यावर खड्डे ; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:31+5:302020-12-22T04:28:31+5:30
हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले ...
हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
नाल्यांवर औषध फवारणी करावी
हिंगोली: शहरातील जिजामातानगर, शाहूनगर भागातील नाल्यांची अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. नगरपरिेषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील नांदेड नाका, बसस्थानक परिसर आदी भागांतील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागातील काही पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत. नगरपरिषदेने पथदिवे सुरू करावेत.
बसस्थानकात खड्डेच-खड्डे
हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून खड्डेच-खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे. याचबरोबर धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धुळीमध्ये प्रवाशांना बसावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका आदी भागांमध्ये नियमांचे उल्लंघन केेले जात आहे. यामुळे अपघात घडत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
नांदेड नाका ते खटकाळी रस्ता खड्डेमय
हिंगोली: नांदेड नाका ते खटकाळी हा रस्ता मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले आहेत. या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग काढून दिला आहे. परंतु, तोही पूर्णत: उखडला आहे.
शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे
पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने दखल घेऊन पिकांवर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.