विजेअभावी रखडले वार्ड स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:50 AM2018-06-19T00:50:04+5:302018-06-19T00:50:04+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र केवळ विद्युत जोडणीअभावी १ व ३ वॉर्ड स्थलांतर करण्यास अडचणी येत असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र केवळ विद्युत जोडणीअभावी १ व ३ वॉर्ड स्थलांतर करण्यास अडचणी येत असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगितले जात आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम मागील पाच वर्षांपासून संथ गतीने सुुरु होते. मात्र जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यामध्ये लक्ष घातल्याने, बांधकामाला गती आलेली असली तरीही अद्याप अंतिम टप्प्यात गेले नाही, हे विशेष! आता तर फक्त विद्युत जोडणी न झाल्याचे कारण समोर केले जात असून, हळूच बाथरुम व इतरही कामे राहिल्याचे अधिकारीच सांगत आहेत. अशा परिस्थितीत वार्ड स्थलांतरित होतील तरी कसे, हा प्रश्न आहे. तर वार्डातील पंखे अद्याप सुरु तर झालेच नाहीत. अडचणीत भर म्हणून वार्ड क्रमांक १ च्या साईड रुममध्येही साहित्य भरुन टाकले आहे. त्यामुळे या ठिकाणी साईड रुम मिळणेही कठीण होऊन बसले आहे.