डोंगरकडा येथे सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:46+5:302021-01-19T04:31:46+5:30
यामध्ये शीतल शिवाजी गावंडे, सत्वशिला दुर्गादास अडकीने, सुधाकर गंगाधर लोमटे, मीराबाई श्यामराव अडकिने, दैवशाला यशवंत पंडित, मारोती अशोक पंडित, ...
यामध्ये शीतल शिवाजी गावंडे, सत्वशिला दुर्गादास अडकीने, सुधाकर गंगाधर लोमटे, मीराबाई श्यामराव अडकिने, दैवशाला यशवंत पंडित, मारोती अशोक पंडित, अश्विनी बाळासाहेब गावंडे, गोदावरी दत्ता अडकिने, संदीप श्यामराव अडकिने आदी उमेदवार निवडून आले आहेत.
डोंगरकडा परिसरातील हिवरा ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात, ११, पैकी ६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत, हिवरा येथे अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. संत देवकामाता शिवमल्हार पॅनलचे अश्रूबाई गणपतराव मुंढे, तुळसाबाई प्रभाकर मुंढे, बाळू चंपती लोने, छायाबाई साहेबराव लोणे, आशाबाई अन्नपूर्णे, शिवकाशीबाई पांडुरंग सोमनगिरे हे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते प्रकाश बावगे, निवासराव मुंढे यांनी प्रयत्न केले. सुकळीवीर ग्रामपंचायतमध्ये सत्ता परिवर्तन, कळमनुरी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या सुकळीवीर ग्रामपंचायतमध्ये सत्ता परिवर्तन होऊन येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनल प्रमुख डॉ. शेख ईसा, पप्पू वीर यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवून ९ पैकी ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यामध्ये शेख आकेफुनिसा मोहम्मद ईसा, शेख मोहम्मद ईसा पाशामिया, मीना संभाजी धुमाळे, संगीता कृष्णकुमार वीर, गंगासागर भिवाजी गवारे, मनीषा चंद्रकांत सितळे, सुनीता पुंजाराम सरकुंडे, कौशल्याबई धोंडिबा धुमाळे, ज्योती भानुदास सरकुंडे आदी उमेदवार विजयी झाले आहेत.