मान्सूनपूर्व उच्चदाब, लघुदाब वाहिनींची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:38+5:302021-04-27T04:30:38+5:30

वाढत्या उन्हात आणि कोरोना काळात वीजग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत आणि वेळेवर मिळावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून मान्सूनपूर्व उच्चदाब व ...

Pre-monsoon high pressure, low pressure pipeline works started | मान्सूनपूर्व उच्चदाब, लघुदाब वाहिनींची कामे सुरू

मान्सूनपूर्व उच्चदाब, लघुदाब वाहिनींची कामे सुरू

Next

वाढत्या उन्हात आणि कोरोना काळात वीजग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत आणि वेळेवर मिळावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून मान्सूनपूर्व उच्चदाब व लघुदाबाची कामे केली जात आहेत. ही कामे १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहेत. तारेला स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले स्टे (तणाव) तोडणे, रस्त्यात किंवा इतरत्र ठिकाणी झुकलेले विजेचे खांबा सरळ करणे, लोंबकळलेल्या तारा ओढून घेऊन त्यास ताण देणे, जुन्या तारा बदलून घेणे आदी कामे नित्याने सुरू आहेत. हिंगाेली शहरातील बांगरनगर, एमआयडीसी, एसआरपी कॅम्प, तसेच माळहिवरा, पेडगाव आदी १२ ठिकाणी ही कामे सुरू आहेत.

मान्सूनपूर्व आवश्यक ती सर्व कामे सहायक अभियंता सचिन बेलसरे, निखिल मोडोकार, नितेश रायपुरे, ज्ञानेश्वर शेकोकार, सरोज चंदनखेडे हे जनमित्र (लाइनमेन) व ठेकेदार यांच्यामार्फत करून घेत आहेत.

सर्वच कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा

जिल्ह्यात कोरोनाचे वाढलेले रुग्ण पाहता कामावरील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. कार्यालयीन कामे करताना काही अडचण आल्यास मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सूचित केले जाते.

- दिनकर पिसे, उपमुख्य कार्यकारी अभियंता, हिंगोली उपविभाग

फोटो नं. १

Web Title: Pre-monsoon high pressure, low pressure pipeline works started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.