पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:45+5:302021-06-06T04:22:45+5:30

गत पंधरा दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरासह वसमत, सेनगाव, औंढा आणि कळमनुरी तालुक्यांत विशेष मोहीम ...

Pre-monsoon maintenance repair work completed | पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे संपुष्टात

पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे संपुष्टात

Next

गत पंधरा दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरासह वसमत, सेनगाव, औंढा आणि कळमनुरी तालुक्यांत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान खांबावर झाडांचा विळखा असणे, वाकलेले खांब दुरुस्त करणे, ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली आहेत. आजमितीस तरी जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यास ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महावितरण कंपनीस सहकार्य करावे

तिन्ही ऋतूंमध्ये पावसाळा हा महत्त्वाचा ऋतू आहे. या दिवसांत वादळी वारे किंवा जास्तीचा पाऊस झाल्यास शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून वीजपुरवठा काही काळाकरिता खंडित करावा लागतो. अशावेळी ग्राहकांनी संयम ठेवणे गरजेचे असते. दुसरीकडे ग्राहकांनी आपल्या घरातील तसेच उद्योगासाठी वापरण्यात येत असलेल्या विजेचा वापर काटकसरीने करावा आणि महावितरण कंपनीस सहकार्य करावे.

Web Title: Pre-monsoon maintenance repair work completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.