रोटा व्हायरस लसीकरणाबाबत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:06 AM2019-05-09T01:06:07+5:302019-05-09T01:07:05+5:30
बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
हिंगोली : बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
नवजात बालकांना रोटा व्हायरस विषाणूमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका अधिक असतो. सुरुवातीला सौम्य व नंतर गंभीर स्वरुप धारण करणाºया या रोटा व्हायरस अतिसारामुळे बालकांचा मृत्युही होऊ शकतो किंवा पाच वर्ष वयापर्यंत बालक कुपोषितही होण्याचा धोका असतो. त्यामुळे बालकांना रोटा व्हायरस लसीकरण आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत आरोग्य विभागाकडून हे लसीकरण केले जात नव्हते. केवळ खाजगी रुग्णालयातच रोटा व्हायरस लस उपलब्ध होती. लससाठी २५० रूपयेपासून ते १ हजारापर्यंत पैसे घेऊन ही लस दिली जात असे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटूंबातील नवजात बालकांना रोटा व्हायरस विरोधी लस घेणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता रोटा व्हायरस लसीकरण मोहिम हाती घेण्याची तयारी केली आहे. साधारणत: जून महिन्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जून महिन्यात लसीकनरणाची मोहिम सुरु होईल. यापूर्वी केवळ खाजगी रुग्णालयातून दिली जाणारी ही लस आता आरोग्य विभागाकडून मोफत दिली जाणार असल्याने सामान्य जनतेसाठी हा मोठा दिलास आहे. तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी, गट वि. अधिकारी, वैद्यकिय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गशिअ व इतर समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांनी सूचना दिल्या.
देशात ४० टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकर बनतात
रोटा व्हायरस हा अत्यंत संक्रमणजन्य विषाणू आहे. मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण रोटा व्हायरस आहे. ज्यामुळे मुलांना रुग्णालयात भरती करावे लागू शकते. अन्यथा मुलाचा मृत्यु देखील होऊ शकतो.
रोटा संसर्गाची सुरुवात सौम्य अतिसाराने होते व नंतर तो गंभीर रूप घेते. उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. पोटदुखी व उलटी होते.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात ४० टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकार बनतात. देशात अतिसारामुळे रुग्णालयात भरती होणाºया मुलांपैकी ४० टक्के मुले ही रोटा व्हायरसने संक्रमित असतात.
वसमत तालुक्यात दरवर्षी ४८०० मुले बालके जन्माला येतात. त्यामुळे या लसीकरणाचा जिल्ह्यातील ४५०० पेक्षा जास्ता बालकांना फायदा होणार आहे.