ताजुश्शरीया कार्यक्रमाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:36 AM2018-08-26T00:36:58+5:302018-08-26T00:37:12+5:30

गुलमाने ताजुश्शरिया कमटीच्या वतीने येथील रजा मैदानात ३० आॅगस्ट रोजी पैगामे ताजुश्शरिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

 Preparations for the Tajushishya program | ताजुश्शरीया कार्यक्रमाची जय्यत तयारी

ताजुश्शरीया कार्यक्रमाची जय्यत तयारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : गुलमाने ताजुश्शरिया कमटीच्या वतीने येथील रजा मैदानात ३० आॅगस्ट रोजी पैगामे ताजुश्शरिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी विविध आठ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. मुफ्ती अख्तर रजाखान यांच्या चाळीसव्या निमित्त लंगरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १६ हजार मुस्लीम बांधव या लंगरचा लाभ घेणार आहेत. शहरासह बाहेर गावातील मुस्लीम बांधवही लंगरचा लाभ घेणार आहेत. या लंगरच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. लंगरनंतर रात्री अजमते, ताजश्शरीया कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सय्यद शाकीर अली (म.प्र.) मो. जाकेर रजा, डॉ. शहरयार रजा, मुन्नवर रजा फैजी, दिलकश रांचरी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मौलाना करीमोद्दीन, मौलाना शाकरे रजनी, अ. हफीज मौलाना सुजात फारुकी, म. शफीक, मौलाना मुबारक हुसेन, म. शादाब मंजूर मौलाना हसैन रजा, म. राशेद आश्रफी, अयुब बरकाती, हुनीफरजा, म. असलम, म. एकबाल, कासीम अमजदी, मौलाना तोहरान अहेमद बेग व गुलामाने, ताजुश्शरीया कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
३० आॅगस्ट रोजी सर्व मुस्लिम बांधवांनी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवून या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:  Preparations for the Tajushishya program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.