५० शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रमाचे केले सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:19 AM2021-07-12T04:19:09+5:302021-07-12T04:19:09+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के, परसराम पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के, परसराम पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध विषय देण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी ११ जुलै रोजी ५० शिक्षकांनी ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी ‘कोरोना काळातील शैक्षणिक उपक्रम’ या विषयावर व्हिडीओ, फोटो, ऑडिओच्या साहाय्याने शिक्षकांनी सादरीकरण केले. प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ध्येयनिष्ठ शिक्षकांचे जि. प.चे सीईओ राधाविनोद शर्मा यांनी कौतुक केले. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, परसराम पावसे यांनी कौतुक केले.
यावेळी चार गटातून झालेल्या सादरीकरणाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले. परीक्षक म्हणून उपक्रमशील शिक्षक जितेंद्र राठी, राजेश सुर्वे, संजय खाडे, प्रभाकर काकडे, डॉ. राजेश गोरे, नेहा शिरोरे, क्रांती कुलकर्णी, दीपक दराडे यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन बालाजी काळे, दीपक कोकरे, अण्णासाहेब कुटे, अरुण बैस यांनी केले. स्पर्धेचे नियोजन विजय बांगर, महेश बोधने, सुमित यन्नावार आदींनी केले.