जलेश्वरच्या विकास आराखड्याचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:25 AM2021-01-15T04:25:10+5:302021-01-15T04:25:10+5:30
आ. तान्हाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांच्या उपस्थितीत हा आराखडा सादर ...
आ. तान्हाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांच्या उपस्थितीत हा आराखडा सादर करण्यात आला. २००६ मध्ये हा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये डिजिटल गार्डन, बोट क्लब, कॅंटिन, ओपन फंक्शन हॉल, म्युजिकल फाउंटन, रस्ते, हिरवळ व झाडांनी सुशोभीकरण यापूर्वी हा दहा कोटींचा प्रस्ताव होता. मात्र, आता जवळपास १४ वर्षे उलटल्याने सर्वच बाबींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला ८० कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे सुधारित आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले. या सुधारित आराखड्यात विद्युतीकरणासह सुशोभीकरणात पुतळे, हिरवळ, झाडे, आदी बाबींमध्ये वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय या ठिकाणी लहान मुलांसाठीही विविध प्रकारची खेळणी झाल्यास जागेनुसार काही नियोजन करता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे, तर इतरही अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या प्रकारच्या सुधारणा करून नवीन दरानुसार हा आराखडा आगामी आठ दिवसांत सादर केला जाणार आहे.
दरम्यान, ही पाहणी सुरू असतानाच देगलूरचे आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी भेट दिली असता त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला.