विज्ञान मेळाव्यात मांडले ४३ प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:38 AM2018-12-10T00:38:52+5:302018-12-10T00:39:05+5:30
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली.
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषय सहज व सोप्या भाषेत शिकता यावा. तसेच विज्ञानाचे विद्यार्थ्यांनी कास धरावी या उद्देशाने शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने कळमनुरी येथेही विज्ञान प्रदर्शनी भरविण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ.विशाल राठोड, एस. जी. राठोेड, नायब तहसीलदार सतीश पाठक, आर. बी. शेळके, संध्या राचलवार आदी उपस्थित होते. १३ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाची मांडणी केली. यात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट पांडण्यात आले होते. उत्कृष्ट शाळेचे बक्षीस जामगव्हाणच्या शासकीय आश्रमशाळेस देण्यात आले. उच्च माध्यमिकमध्ये जामगव्हाण शाळेच्या विठ्ठल मेडके, वर्षा खरवडे यांनी तयार केलेल्या सौर उर्जेच्या प्रयोगाला प्रथम बक्षीस मिळाले. या विद्यार्थ्यांना एस.टी.सूर्यवंशी, एस.आर.एन्नावार यांनी मार्गदर्शन केले. माध्यमिकमध्ये नागेशवाडीच्या शाळेला प्रथम, गोेटेवाडी द्वितीय तर पिंपळदरीच्या शाळेला तिसरे बक्षीस मिळाले. प्राथमिकमध्ये पालमची प्रथम, आ.बाळापूर द्वितीय तर सिरळीच्या शाळेला तिसरे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण तहसीलदार कैलासचंद वाघमारे यांच्या हस्ते केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले.