साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:37+5:302021-06-25T04:21:37+5:30
शहरातील बहुतांश बाजारपेठेतील किराणा दुकानांमध्ये गुळाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन व्यापारीही गुळाची खरेदी जास्त ...
शहरातील बहुतांश बाजारपेठेतील किराणा दुकानांमध्ये गुळाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन व्यापारीही गुळाची खरेदी जास्त प्रमाणात करत आहेत. सन २००० मध्ये गुळाचा भाव ४० रुपये किलो, २००५ मध्ये ३० रुपये किलो, २०१० मध्ये ३५ रुपये किलो, २०२० मध्ये ४२ रुपये किलो तर २०२१ मध्ये गुळाचा भाव ४५ ते ५० रुपये किलो झाला आहे.
कोरोना आधी युवक मंडळी गुळाकडे पाहतसुद्धा नव्हती. परंतु, कोरोनामुळे सद्य:स्थितीत युवक मंडळीही गुळाच्या चहाला पसंती देत आहेत. सणावाराला गुळाचे पदार्थ मोठ्या आवडीने खात आहेत. गूळ हा आरोग्यासाठी चांगला असल्याचे आयुर्वेदातही सांगितले जात असल्याने मागणी वाढली आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील हाॅटेलचालकही गुळाचा चहा विक्री करत आहेत. काही ठिकाणी ‘गुळाचा चहा मिळेल’ असेही फलक लावल्याचे बाजारपेठेत पहायला मिळत आहे.