सेनगाव कृउबाचा तुरीला हमीभावापेक्षा जास्त भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:34+5:302021-01-08T05:36:34+5:30
सर्व शेतीमालांचे एक बीट असल्याने सर्व खरेदीदार बोलीसाठी येत आहेत. ४ जानेवारी रोजी भीमराव चव्हाण (धानोरा), खंडू बोरगाडे ...
सर्व शेतीमालांचे एक बीट असल्याने सर्व खरेदीदार बोलीसाठी येत आहेत. ४ जानेवारी रोजी भीमराव चव्हाण (धानोरा), खंडू बोरगाडे (कावी), किसन जाधव (वाघजाळी), नामदेव पोेले (वटकळी), कैलास गुहाडे (गणेशपूर), उत्तम कऱ्हाळे (सुकळी) यांचे ६ हजार प्रतिक्विंटल रुपयांनी तूरविक्री झाली. तुरीला हमीभावापेक्षा जादा पैसे मिळत असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.
बाजार समितीने खुली लिलाव पद्धत बंद करू नये. कारण, यातून शेतकरीराजाला चांगला भाव मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब मिळत आहेत. शेतकऱ्यांनी येतेवेळेस माल स्वच्छ व साफ करून आणावा, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. हमीभावापेक्षा जादा दराने तूर खरेदी करणारे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बालमुकुंद जेथलीया, संजय देशमुख, बालूभाऊ तोष्णीवाल, शिवाजी देशमुख, गोविंद जेथलीया, विष्णू सोनटक्के, सुधाकर उखळकर, प्रकाश बिडकर, नंदकिशोर झंवर, रितेश मुंदडा, राहुल लव्हंडे, पुरुषोत्तम जेथलीया, बद्री लाहोटी, कायंदेमामा, काशीनाथ देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, रामदास कुटे, छत्रुघ्न देशमुख, कुंदर्गे देवराव, दत्तराव लाटे, विलास गोडसे यांचे व लिलाव पुकरणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशासक किसन फिसके, सचिव दत्तात्रय वाघ यांनी बाजार समितीकडून स्वागत केले.