औंढ्यात प्रधानमंत्री आवास कक्षास कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:13 AM2019-09-21T00:13:35+5:302019-09-21T00:14:08+5:30
येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाला सत्ताधाऱ्यांनी कुलूप ठोकल्यामुळे येथील लाभार्थ्यांची कामे खोळंबली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाला सत्ताधाऱ्यांनी कुलूप ठोकल्यामुळे येथील लाभार्थ्यांची कामे खोळंबली आहेत. आचारसंहितेपूर्वी न.पं. कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास या लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास विलंब होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी या विभागाला कुलूप लावल्याने प्रशासन व लाभार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
औंढा येथील नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७९१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यातील २५० लाभार्थ्यांना नगरपंचायतीकडून बांधकामाचे कार्यारंभ आदेश दिल्याची न.पं.कडे नोंद आहे. त्यातील ५२ घरकुल लाभार्थ्यांना कुठल्याच पदाधिकारी व गटनेत्यांना विश्वासात न घेता पहिला हप्ता वाटप केल्याने न.पं.तील पदाधिकारी नाराज झाले. त्यांनी एकत्र येऊन न.पं.च्या घरकुल विभागातील कर्मचारी व मुख्याधिकाºयांवर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत कुलूप ठोकले आहे. आज या घटनेला पाच दिवस लोटूनहीे कुलूप काढण्यास कोणत्याही पदाधिकारी व अधिकाºयाने पुढाकार घेतला नाही. सदरील प्रकरण सध्या जिल्हाधिकाºयांच्या कोर्टात गेले आहे. चौकशी करून कारवाईची मागणी सत्ताधाºयांनी केली आहे. आज ज्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले त्यांनी स्वत:जवळील पैसे खर्च करून बांधकाम सुरू केले आहे. असे असले तरी अजून काही घरकुल लाभार्थ्यांना कार्यारंभ नसतानाही त्या प्रभागातील नगरसेवकांच्या सगण्यावरून काम सुरू केले. त्यामुळे हे लाभधारक नगरसेवकाला जाब विचारत आहेत. त्यामुळे न.पं. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. असे असलेतरी काही नगरसेवक यांनी स्वत:कडे बांधकामाचे कार्यारंभ आदेश ठेवल्याचेही सांगितले जातआहे. सध्या कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवू शकते. त्यामुळे लाभार्थी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी न.पं.च्या घरकुल विभागात चकरा मारीत आहेत. तसेच ज्यांचे काम प्रगतीपथावर आहे, आशांना या विभागात प्रोग्रेस रिपोर्ट देण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने ही सर्वच कामे रखडली आहेत.
पाच दिवस उलटूनही कुलूप उघडेना
या बाबत न.पं. चे मुख्यधिकारी निशिकांत प्रचंडराव म्हणाले, शहरात घरकुल योजनेतंर्गत दोन डीपीआर मंजूर आहेत. यातील पहिला १४६ घरकुलांसाठी तर दुसरा ६४५ घरकुलासाठी डीपीआर मंजूर झाला आहे. यापैकी १४६ घरकुलासाठी मंजूर झालेली यादी डीपीआरमधून नगरपंचायतीच्या वतीने ५२ घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली. सर्वांना नियमानुसारच पहिला हप्ता वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी किंवा इतर मात्र या प्रश्नावर बोलायला तयार नसून प्रशासनाच चूक असल्याचे सांगत आहेत. प्रशासन नियमावर बोट दाखवत आहे.