ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:05 AM2018-01-16T00:05:41+5:302018-01-16T00:05:45+5:30

सण, कार्यक्रम व सामाजिक उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केले जाते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. वर्षभरात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 Prison edification if violation of sound restrictions | ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा

ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सण, कार्यक्रम व सामाजिक उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केले जाते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. वर्षभरात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यात वर्षभरामध्ये ध्वनी प्रदूषण करणाºया एकूण आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त ६ जणांवर कारवाई कळमनुरी ठाणे अंतर्गत करण्यात आली. तर वसमत शहर ठाणे १ व कुरूंदा ठाणे १ एकूण आठ कारवायांची नोंद पोलीस दरबारी आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरीता जनजागृती अभियान राबविले जाते. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात असली तरी, याला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाने एकूण १३ ठाण्यांना ४४ ध्वनी मोजमापक यंत्रे वाटप केली आहेत.
डॉक्टर म्हणतात...- ध्वनी प्रदूषणाचे लहान बालकांवर लवकर परिणाम होतात. कमी वजनांच्या बालकांना शक्यतोवर मोठ्या आवाजांपासून दूर ठेवायला हवे. मोठ्या आवाजाने बाळ दचकते, किंवा कानाचे त्यांना विविध आजार जडतात. त्यामुळे बालकांना मोठ्या आवाजापासून दूर ठेवण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. तसेच कानात मोठा आवाज झाल्यास कानातील पडद्यास इजा होऊन लहान मुलांना बहिरेपणा येऊ शकतो. असे डॉ. एन. डी. करवा यांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितले.
ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षांची तरतूद आहे. या नियमाखालील गुन्हे दखलपात्र, अजामीनपत्र व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतात. शिवाय यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेशही शासनाने पोलीस यंत्रणेस दिलेले आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी आणि पोलिसांनीही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आहेत.
शासनाने ठरवून दिलेली ध्वनिमर्यादा
४ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल तर रात्री ७० डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल तर रात्री ५५ डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल ते रात्री ४० डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा ठरवून दिलेली आहे.

Web Title:  Prison edification if violation of sound restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.