ई-पासशिवाय खासगी प्रवाशी वाहनांना प्रवेश देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:29 AM2021-04-25T04:29:58+5:302021-04-25T04:29:58+5:30
हिंगोली: जिल्ह्याच्या सिमेवर नाकाबंदी लावून सर्व वाहनांची तपासणी करावी, तसेच ई-पास असल्याशिवाय इतर जिल्ह्यातील खासगी प्रवाशी वाहनांना हिंगोली जिल्हयात ...
हिंगोली: जिल्ह्याच्या सिमेवर नाकाबंदी लावून सर्व वाहनांची तपासणी करावी, तसेच ई-पास असल्याशिवाय इतर जिल्ह्यातील खासगी प्रवाशी वाहनांना हिंगोली जिल्हयात प्रवेश देऊ नये, अशा सूचना पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी दिल्या. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २४ एप्रिल रोजी सकाळी कलासागर यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी कलासागर म्हणाले, कोरोना लसीकरण राहिलेल्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. यासाठी २८ एप्रिल रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करतांना सोशल डिस्टन्स पाळूनच कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत बळाचा वापर करू नये, रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना तातडीची मदत लागल्यास कर्मचाऱ्यांनी मदत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा हद्दीवर तपासणी नाके सुरू करून सर्व खासगी वाहनांची तपासणी करावी. त्यांच्याकडे ई-पास असेल, तरच त्यांना जिल्हयात प्रवेश द्यावा. मात्र, ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना चौकशीसाठी कुठेही थांबवून घेऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो : २