कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:31+5:302021-08-18T04:35:31+5:30
निवेदनात म्हटले की, एसजीएसपीचे लाभ मिळण्यासाठी शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत वर्गीकृत करावे, ४ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी ...
निवेदनात म्हटले की, एसजीएसपीचे लाभ मिळण्यासाठी शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत वर्गीकृत करावे, ४ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी बाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे, डीसीपीएस कपातीची माहिती उपलब्ध करून द्यावी, अघोषित तुकड्यांना घोषित करून, प्रचलित पद्धतीने अनुदान देण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत, तसेच या मागण्याचा विचार न झाल्यास २५ ऑगस्टपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने व कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रा.गजानन आसोलेकर, उपाध्यक्ष प्रा.संजय चाटे, सचिव प्रा.सुनिल कावरखे, प्रा.रमेश वाव्हुळे, प्रा.देवानंद येवले, आर.एस. रणवीर, एस.डी. कावरखे, एस.एस. भगत, ए.पी. बिरादार, बी.आर. पतंगे, डी.एस. पाटील, एस.जे. काळे, आनंद काळे, वाय.जे. शेख, बी.एस. कावरखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.