जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:38 AM2018-06-05T00:38:40+5:302018-06-05T00:38:40+5:30
जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
या प्रक्रियेसाठी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सीईओ एच.पी. तुम्मोड, सभापती भैय्या देशमुख, प्रल्हाद राखोंडे यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुखांची उपस्थिती होती. आरोग्य-७, पशुसंवर्धन ४, शिक्षणची एक अशा तीन विभागांच्याच बदल्या झाल्या. तर कृषी, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून कोणीही बदलीस उत्सुक नव्हते.
उद्या ५ जूनला सामान्य प्रशासना, पंचायत, महिला व बालकल्याण आदी विभागातील संवर्ग कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत. यात कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. समुपदेशन पद्धतीत बदलीस नकार देण्याची मुभा असल्याने अनेकांनी त्यावरच भर दिल्याचे चित्र होते.