निधी वाटपाची प्रक्रिया संथपणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:15 AM2018-12-24T00:15:49+5:302018-12-24T00:16:11+5:30

मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य खात्यातर्फे संथगतीने सुरू आहेत. तालुकास्तरावरून लाभार्थ्यांच्या याद्याही अप्राप्त आहेत.

 Process of funds allocation slow | निधी वाटपाची प्रक्रिया संथपणे

निधी वाटपाची प्रक्रिया संथपणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य खात्यातर्फे संथगतीने सुरू आहेत. तालुकास्तरावरून लाभार्थ्यांच्या याद्याही अप्राप्त आहेत.
जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली या तीन तालुक्यांचा मानव विकासमध्ये समावेश आहे. या तीन्ही तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी महिलांची तालुकानिहाय आकडेवारी यामध्ये हिंगोली तालुक्यातील १०७२ लाभार्थी महिलांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील १०९३ आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील ९२४ याप्रमाणे एकूण ३०८९ महिलांना बुडित मजुरी देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर व बाळंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. गरोदरपणात आणि प्रसुतीनंतरचा कालावधीत मानव विकासकडून मातांची मजुरी बुडते. सदर महिला आर्थिक लाभासाठी मजुरी करण्यासाठी किंवा कामावर जाऊ नये याची काळजी घेत मानव विकास योजने अंतर्गत बुडित मजुरी दिली जाते. प्रथम दोन हजार आणि प्रसुतीनंतर दोन हजार रुपये एकूण चार हजार रूपये अशी लाभाची रक्कम आहे. सदर लाभाची रक्कम ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाकडे गरोदर मातांना बुडित मजुरी म्हणून अर्थसहाय्यसाठी १ कोटी २३ लाख ५६ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व ० ते ६ वयोगटातील बालकांची तसेच माता यांची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार व शिबीरे यासाठी ४६ लाख ८ हजार रूपये निधीस मंजूरी मिळाली आहे. मानव विकासकडून या दोन्ही प्रकारचा निधी आरोग्य खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया करून आरोग्य खात्याने लाभार्थी महिलांना बुडित मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत वर्ग करणे गरजेचे आहे.
सदर निधीस मानव विकासकडून मंजुरी मिळाली असली तरी, अद्याप याबाबत आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले नाही. तालुका स्तरावरून याद्याही अप्रपाप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम कधी वर्ग होईल हा एक प्रश्न आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळेल. सध्या तालुकास्तरावरून याद्या मागविल्या जात असल्याचे आरोग्य खात्याच्या संबधित विभागाकडून माहिती देण्यात आली.
शासनाकडून लाभार्थ्यांना दिली जाणारी बुडित मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार असून याबाबत संबधित तालुका आरोग्याधिकाºयांनी याद्या दाखल करण्याच्या सूचनाही आहेत.

Web Title:  Process of funds allocation slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.