मृदा दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:05 AM2018-12-08T00:05:58+5:302018-12-08T00:06:28+5:30
दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, यामुळे उत्पन्नामध्ये घट, यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील विविध गावामध्ये जावून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, यामुळे उत्पन्नामध्ये घट, यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील विविध गावामध्ये जावून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी माहिती देण्यात आली.
जागतिक मृदा दिनानिमित्त जमिनीची सुपीकता टिकविण्या संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी रासायनिक खतांचा वाढणारा वापर व सेंद्रीय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज लक्षात घेवून हिंगोली तालुक्यातील ईडोळी, आंबाळा, जांभरून जहागीर आदी गावांमध्ये जावून शेतीविषयक माहिती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इडोळीचे सरपंच नामदेव जाधव, कृषी पर्यवेक्षक सी.डी. कोटकर, क्षीरसागर, देशमुख, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.