हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:43 AM2018-02-18T00:43:55+5:302018-02-18T00:44:08+5:30

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने दिली आहेत.

 Prohibition of Chhatham's remarks in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध

हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने दिली आहेत.
सकल मराठा समाज
४हिंगोली - सकल मराठा समाज हिंगोलीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन दिले. श्रीपाद छिदंम याच्यावर कठोर कारवाई करून अशा विघातक प्रवृत्तींना पायबंद घालण्याची मागणी केली. तर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात छिंदमविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांच्याकडे केली. यावेळी सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीचे खंडेराव सरनाईक, मनीष आखरे, बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल, भूषण देशमुख, पप्पू चव्हाण, प्रा.संभाजी पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सुजय देशमुख, गजानन इंगोले, त्र्यंबक लोंढे, बालाजी वानखेडे, वैभव चव्हाण, अमोल देशमुख, नामदेव सपाटे आदींची उपस्थिती होती.
गोरेगावात निषेध
४गोरेगाव - येथे बौद्ध व मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने निषेध केला. दोन्ही समाजांकडून सपोनि रवींद्र सोनुवणे यांच्याकडे निवेदन सादर केले. बहुजन प्रतिपालक, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाºयावर कारवाईची मागणी केली. निवेदनावर नागेश कांबळे, मंगेश सरकटे, डॉ. रमेश नरवाडे, राजू रसाळ, गौतम कांबळे, किसन वाघमारे, राजू चºहाटे, सुधिर मोरे, सुभाष रणबावळे, मधुकर बनसोडे, रमेश खिल्लारे, सिद्धार्थ पडघण, पवन मोरे, संदीप गायकवाड, उद्धव गायकवाड, दिनकर वाकळे, विशाल पठाडे, शेख मुराद, शेख अहेमद, सय्यद मुस्तफा, सय्यद सादीक, महोमद कलीम, शेख सम्मद शेख फेरोज, शेख तोफीक आदींच्या स्वाक्षºया आहेत.
श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल व शिवजयंती विषयी अवमानकारक केलेल्या वक्त व्याचा मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध केला. तर छिंदमला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर राकाँ जिल्हाध्यक्ष, मो. इसाक, उर्फ मुनिर पटेल, जिल्हाध्यक्ष शे. नईम, शे. बुºहान पहेलवान, मौलाना नाजेर अहेमद, नगरसेवक शेख शकील, शे. आरेफ बागवान, शेख खलील बेलदार, खय्युम पठाण, शेख गफार, आमिर खान पठाण, शेख फेरोज शे रफीक, शेख बुºहाण, शेख फारुक, शेख बबलू आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  Prohibition of Chhatham's remarks in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.