हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:07 AM2019-08-24T00:07:49+5:302019-08-24T00:08:52+5:30
मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यभरात वरील मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. हिंगोली येथे आंदोलन करून प्रशासनाकडे निवेदन सादर करताना आर. जी. कºहाळे, बी. डी. शिंदे, व्ही. के. कºहाळे, व्ही. आर. जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सेनगाव येथे आंदोलन
सेनगाव : पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व महाराष्ट्र राज्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २३ आॅगस्टला विना अनुदानित शिक्षकांच्या विविध माग्यांसाठी पुकारलेल्या एकदिवसीय शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद होत्या. शासनाने आंदोलनाची दखल घावी अशी मागणी करीत आगामी काळात बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा संघटनेचा वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला.