प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:46 PM2022-10-19T14:46:58+5:302022-10-19T14:47:45+5:30

प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

Property dispute went to extreme level; Son killed the father in Vasmat | प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

googlenewsNext

वसमत (जि. हिंगोली) : शहरातील बसस्थानकासमोर ६५ वर्षीय बापास पोटच्या लेकाने धारदार शस्त्राने पोटावर वार करून संपविले. काही क्षणात ही घटना घडली. बघ्यांना काही कळण्याआधीच खून करणाऱ्याने दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान घडली.

वसमत शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये १८ ऑक्टोबर रोजी सकाळी अंबाजी गायकवाड (वय ६५, रा. गणेशपूर, ह.मु. औरंगाबाद) हे बसले होते. अचानक त्यांच्या पोटच्या मुलासह तिघे त्यांच्या दिशेने आले. धारदार खंजीरने त्यांच्या पोटावर वार करून इतरांना काही कळण्याआधीच दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना कळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती त्यांना मिळाली. पसार झालेल्या तिघांचा शहर पोलीस ठाण्याचे पथक शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा खून प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. 

मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ अंबाजी गायकवाड ( रा. खंदारबन जवळा, वसमत) , राजू श्रावणे ( रा. वापटी, वसमत ) , उत्तम गजभारे, सुमेध उत्तम गजभारे ( दोघे रा. टाकळगाव, वसमत ), गोविंद धुराजी मुळे ( औंढा) अशी आरोपींची नावे आहेत.  

मारेकऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध...
खून करून पसार झालेल्या आरोपींचा शोध दोन पोलीस पथक घेत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेतल्या जाईल. अंबाजी गायकवाड यांचा मारेकरी त्यांचा मुलगा आहे. त्याच्यासोबत इतर काहीजणांचा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, वसमत.

Web Title: Property dispute went to extreme level; Son killed the father in Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.