स्थायी समितीच्या बैठकीत कनिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:33 AM2021-08-19T04:33:02+5:302021-08-19T04:33:02+5:30
हिंगोली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले हे होते. यावेळी उपाध्यक्ष मनीष ...
हिंगोली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले हे होते. यावेळी उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती महादेव एकलारे, रूपाली पाटील गोरेगावकर, बाजीराव जुमडे उपस्थित होते. यावेळी जुमडे यांनी कनिष्ठ अभियंता तरडे यांच्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे सांगून ते कायम गायब राहत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दिलेली कामे वेळेत न करणे, कामाचे मोजमाप न घेणे, लोकप्रतिनिधींचे फोन न उचलणे अशा अनेक तक्रारी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष आखरे यांनी यात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
वसमत तालुक्यातील कोठारी येथील क्रीडा विभागाच्या निधीचा अपहार प्रकरणात ग्रामसेवकावर कारवाई झाली. मात्र संबंधित सरपंच अजूनही मोकळाच राहिल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. त्याचबरोबर पुन्हा चौकशी करून कारवाई करण्याची मागणी एकलारे यांनी केली.
शिक्षण विभागाच्या कामाच्या निविदा काढूनही ही कामे सुरू केली जात नसल्याची तक्रार जि. प. सदस्य सुवर्णमाला शिंदे यांनी केली. तर ही कामे केली जात नाहीत? असा सवाल त्यांनी केला.