नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध ; जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:35 AM2021-08-25T04:35:08+5:302021-08-25T04:35:08+5:30

मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील शिवसैनिकांमधून रोष व्यक्त केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हिंगोली शहरातील शिवसेना व भाजपच्या ...

Protest against Narayan Rane's statement; Shiv Sainiks are aggressive in the district | नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध ; जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक

नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध ; जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक

Next

मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील शिवसैनिकांमधून रोष व्यक्त केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हिंगोली शहरातील शिवसेना व भाजपच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, हिंगोली शहरात आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, आनंद जगताप, भानुदास जाधव, श्रीराम बांगर, दिपक बांगर, बाळासाहेब मगर, गोपू पाटील, विठ्ठल चौतमल, अक्षय नागरे, रत्नाकर बांगर, गजानन बांगर, शंकर बांगर, गजानन सांगळे, शंकर यादव, निखिल आप्पा, गिरीष गुंडेवार, पिंटू सांगळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protest against Narayan Rane's statement; Shiv Sainiks are aggressive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.