पहिल्याच पावसात बसस्थानकात पाण्याचे डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:46+5:302021-06-10T04:20:46+5:30
मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी साचले होते. पर्यायाने प्रवाशांना पाणीमय खड्ड्यांतून ये-जा करावी लागली. ...
मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी साचले होते. पर्यायाने प्रवाशांना पाणीमय खड्ड्यांतून ये-जा करावी लागली. काही महिन्यांपासून नवीन बसस्थानक करण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना धुळीचा त्रास तर आता साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा प्रवाशांनी बसस्थानक प्रमुखांकडे सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. नवीन बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकात प्रवाशांना बसावे लागत आहे. सद्य:स्थितीत बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली आहे. कित्येक वेळा बसच्या टायरखाली गिट्टी येऊन बाजूला उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यताही आहे, अशी तक्रारही काही प्रवाशांनी केली.
प्रवाशांना लवकरच सोयी-सुविधा
गत काही महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाचे काम पूर्ण झाले की, प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. कोरोना महामारी लक्षात घेता प्रवाशांनी मास्क घातल्याशिवाय प्रवास करू नये.
- पी.बी. चौतमल, आगारप्रमुख, हिंगोली
फोटो ६