जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:00 AM2018-03-12T00:00:55+5:302018-03-12T00:01:40+5:30

सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ११ मार्च रोजी ठिक-ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते.

 Pulse Polio Campaign in District | जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहिम

जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहिम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ११ मार्च रोजी ठिक-ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते.
सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच शासकीय कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ पाजण्यात यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. आता ‘डोर टू डोर’ जावून पोलिओचा डोस बालकांना दिला जाणार आहे.

Web Title:  Pulse Polio Campaign in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.