१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:25 AM2018-03-23T00:25:53+5:302018-03-23T11:57:35+5:30
जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. पहिल्या टप्प्यातील शेतकरी आता चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत. त्यातच हमीभाव केंद्रांवरील अनियमिततेच्या संकटाने अजून पाठ सोडली नसल्याचे चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू आहे. त्यावर नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर खरेदी होत आहे. मात्र कधी-मधी शेतकºयांना मुक्काम करुन तूर विकण्याची वेळ अजून कमी झालेली नाही. तर नाफेडच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना तूर माघारी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या खरेदी केंद्रावर माळहिवरा येथील एका शेतकरी तूर घेऊन येण्याचा एसएमएस आल्याच्या दुसºया दिवशी म्हणजे २० मार्च रोजी आला तरीही अजून तूर मोजणी झालेली नव्हती. सदर शेतकरी सुधाकर जाधव यांना स्वत:च्या पुतणीच्या साखरपुड्यासही यामुळे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा इशारा देताच नाफेडची यंत्रणा खडबडून जागी झाली व तूर खरेदी केली. कळमनुरीतील प्रकार तर राज्यभर गाजत आहे. तूर खरेदीसाठी शेतकºयाकडून ४0 हजारांची लाच घेतानाच तिघांना पकडले. इतरही केंद्रांवर नाफेडची मंडळी अशीच थोडीबहुत परिस्थिती इतरत्रही आहे. मात्र शेतकºयांना हमीभावासाठी निमूटपणे हे सगळे झेलावे लागत आहे.
आतापर्यंत १२.३७ कोटी रुपयांची तूर खरेदी झालेली असली तरीही अजून चुकारे वाटपास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी अनियमिततेमुळे चुकारे लटकले होते. निदान या वेळेस तरी काही गोंधळ होऊ नये याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. मोठ्या पोटतिडकीने शेतकरी चुकाºयांची चौकशी मार्केट कमेटीकडे करीत आहेत. त्या प्रत्येक शेतकºयांना नव- नवीन तारीख सांगून काढून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शासनाने तूर खरेदीसाठी १९ हजार कोटीला मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्टÑासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे तूर खरेदी झालेल्या शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कागदपत्र बरोबर असणाºया शेतकºयांच्या
बँक खात्यावर आॅनलाईन चुकारे जमा होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांनी नि:संकोचपणे हमी केंद्रावर तूर विक्री करण्याचेही आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीचा गोंधळच सुरु आहे. त्यामुळे तूर विक्रीस घेऊन आलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मुक्काम टाकण्याची वेळ अजून तरी टळलेली नाही.
असे आहे तूर खरेदीचे चित्र
हिंगोली जिल्ह्यात २२ हजार ७०२ क्विंंटल तुरीची खरेदी केलेली आहे. यामध्ये हिंगोली येथील खरेदी केंद्रावर २५० शेतकºयांची ३ हजार ४८४ क्विंटल, सेनगाव येथे ४९७ शेतकºयांची ५ हजार ७८८ क्विं, कळमनुरी ६३८ शेतकºयांची ६ हजार ११५ क्विं तर वसमत येथे ३९२ शेतकºयांची २ हजार ७०४ क्विंटल, जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ४९१ शेतकºयांची ४ हजार ६११ क्विंटल अशा एकूण २ हजार २६८ शेतकºयांची २२ हजार ७०२ क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील ६१५८ क्ंिवटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचली तर १६ हजार ५४३ क्विंटल पोहोचणे बाकी आहे.