शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

By विजय पाटील | Published: September 12, 2022 05:56 PM2022-09-12T17:56:02+5:302022-09-12T17:57:41+5:30

जे गद्दार झाले, ते आगामी काळात दिसणार नाहीत

Put those who talk of burying Shiv Sena in the dust: Bhaskar Jadhav | शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

googlenewsNext

हिंगोली : बाळासाहेबांनी भाजपला सांभाळले म्हणून आज ते मोठे झाले. पण शिवसेनेला सांभाळायचे होते, तेव्हा भाजपने फक्त त्रास दिला. एवढेच नव्हे, तर अमित शहा महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला मातीत मिसळण्याची भाषा करतात. शिवसैनिकांनो, त्यांना सोडू नका. आगामी निवडणुकीत त्याचा बदला घेऊ. ही भाषा करणाऱ्यांना मातीत घालू, असे आवाहन शिवसेना नेते आ.भास्कार जाधव यांनी हिंगोली येथील मेळाव्यात केले.

म.गांधी चौक परिसरात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.जयप्रकाश मुंदडा, ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, माजी आ. संतोष टारफे, अजित मगर, गोपू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

जाधव पुढे म्हणाले, जे गद्दार झाले, ते आगामी काळात दिसणार नाहीत, असा एक सर्व्हे आला आहे. कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हटवून शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार पाडत भाजपने घात केल्याचा जनतेत राग आहे. उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या निर्णयामुळेच गद्दारांना पूर्वी व नंतरही मंत्री होण्याची संधी मिळाली. राज्यात राष्ट्रवादी व भाजपचे सरकार असते तर हे शक्य होते का? जर राष्ट्रवादी मान्यच नव्हती तर मंत्रिपद न घेता आमदार म्हणून काम करायला का तयार झाले नाही? माझ्या वडिलांचे नाव का घेता तुमच्या वडिलांचे नाव घेऊन जनतेसमोर जा, असे उद्धव ठाकरे यांनी आव्हान देताच या गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचे नाव कुणीही घेऊ शकते, असा सूर लावला. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदावरून हटवले तर आता तुमच्या मंत्रिपदाची पाटी बाळासाहेबांना बाप म्हणून लावा. तर तुम्हाला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो, असे उत्तर जाधव यांनी दिले. 

पोलिसांनो, वर्दीची लाज राखा
हिंगोली जिल्ह्यात मटक्याच्या जीवावर जर शिवसैनिकांना त्रास देत असाल तर यादा राखा. पोलिसांनी वर्दीची लाज बाळगावी. मटकेवाल्यांना आत टाका अन्यथा विधानसभेच्या सभागृहात याचा हिशेब घेऊ, असा इशारा जाधव यांनी दिला.

Web Title: Put those who talk of burying Shiv Sena in the dust: Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.