खणके यांनी मांडला शेतकऱ्यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:51 PM2018-11-03T23:51:25+5:302018-11-03T23:51:40+5:30
तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.
सेनगावसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी खणके यांना थेट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाल्याने प्रसिध्दीझोतात आले. ते तालुक्यातील केलसुला येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. ते गेल्या दहा वर्षांपासून केबीसीमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. यंदा संधी मिळाली. तर त्यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले आहेत. खणके यांची सदर प्रतिनिधीने त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. खणके म्हणाले की, राज्यात शेतकºयांचे प्रश्न सोडवण्यास कोणीही वाली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते कायम आहेत. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी आज दुष्काळी परिस्थितीमुळे जगावे कसे? या विवंचनेत आहे. या कार्यक्रमातून त्यावर प्रकाश पडला. शिवाय अमिताभ बच्चन यांना भेटलो, यातच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. खणके यांनी अमिताभ यांच्यासमोर आमच्या भागात लाईट व्यवस्थित राहत नाही. आम्ही शेतकºयांनी शेतीला पाणी कसे देणार, असा प्रश्न मांडला. तर बच्चन यांनी शेतकºयांना मदत करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले. यामुळे खणके प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आ.रामराव वडकुते यांनीही या शेतकºयाचा सत्कार केला.