शेतकरी व निराधारांच्या बँकेत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:35+5:302021-05-25T04:33:35+5:30
यंदा खरिपाचा हंगाम जवळ आला तरीही अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांना प्रवेशच दिला जात नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना ...
यंदा खरिपाचा हंगाम जवळ आला तरीही अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांना प्रवेशच दिला जात नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना बँकेत येण्यास मनाई करण्यात आली होती. व्यापारी व शासकीय कार्यालयांचेच व्यवहार सुरू होते. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांमध्ये एक दिवस शेतकऱ्यांसाठी, तर एक दिवस शासकीय व व्यापारविषयक व्यवहारांसाठी दिल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे वाटत होते. मात्र, अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात असला तरीही पीककर्जासाठीची कागदपत्रे ठेवून घेत नुसतेच हेलपाटे मारायला लावले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याचे दिसत आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असताना हे चित्र आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते. या बँकेत मात्र शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. कमी प्रमाणात ही बँक कर्ज देत असली तरीही ती हक्काची आहे. त्यामुळे या बँकेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच निराधारांचेही वेतन अदा करण्यात येत असल्याने निराधारांचीही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणीही निराधारांना स्वतंत्र दिवस देऊन बँकेने नियोजन करण्याची गरज आहे.