हिंगोली शहरातील जुगार अड्ड्यावर छापा; १६ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:32+5:302021-07-25T04:25:32+5:30

हिंगोली शहरातील बावनखोली परिसरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाला मिळाली होती. ...

Raid on a gambling den in Hingoli town; Crimes registered against 16 gamblers | हिंगोली शहरातील जुगार अड्ड्यावर छापा; १६ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

हिंगोली शहरातील जुगार अड्ड्यावर छापा; १६ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

Next

हिंगोली शहरातील बावनखोली परिसरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने मोबाइल टॉवर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी टिनपत्र्याच्या खोलीत गोलाकार बसून पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून नगदी रक्कम, मोबाइल, पाण्याचा जार, कूलर, जुगाराचे साहित्य असा ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच यातील १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अजिमखाँ रहेमतखाँ पठाण यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात देवीदास भगवान शिंदे (रा. हिवरा जाटू), मन्नानखाँ आलू खाँ पठाण (रा. मस्तानशहा नगर), शेख अहमद शेख राजा (रा. मस्तानशहा नगर), अमोल श्रीराम घुगे (रा. पोळा मारोती), सुमीत मधुकर दराडे (रा. पोळा मारोती), नागेश विजय बांगर (रा. पोळा मारोती), विनायक राजू जाधव (रा. वंजारवाडा), शहबाजखाँ कलीमखाँ पठाण (रा. बावनखोली), फेरोजखाँ ऊर्फ समीरखाँ हबीबखाँ पठाण (रा. मस्तानशहा नगर), शेख शकील शेख नजीर (रा. पुसेगाव), बालाजी सोपान बोखारे (रा. डिग्रस कऱ्हाळे,), शेख इम्रान शेख सलीम (रा. महादेववाडी), युनुसखाँ रहेमतखाँ पठाण (रा. मस्तानशहा नगर), नंदू बांगर (रा. वंजारवाडा), बजरंग जैस्वाल (रा. बावनखोली), उमेश बांगर (रा. वंजारवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना. जाधव करीत आहेत.

Web Title: Raid on a gambling den in Hingoli town; Crimes registered against 16 gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.