मंत्री आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:30 AM2018-12-12T00:30:49+5:302018-12-12T00:31:11+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे धक्का-बुक्की करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता रिपाई ‘ए’ चे मराठवाडा प्रदेशि सचिव दिवाकर माने यांच्या नेतृत्वात हिंगोली येथील रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे धक्का-बुक्की करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता रिपाई ‘ए’ चे मराठवाडा प्रदेशि सचिव दिवाकर माने यांच्या नेतृत्वात हिंगोली येथील रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती. आंदोलन दरम्यान आठवले यांच्या सुरक्षिततेत वाढ करून संपूर्ण देशात झेड-प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला जातात, त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत. त्यामुळे संबधित पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुरक्षिततेची काळजी घेण्यातबाबत आदेशित करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन स्टेशन अधीक्षकांना देण्यात आले. तसेच रामदास आठवले यांच्यावर हल्ला करणाºया यावेळी रिपाइं ‘ए’ चे मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष वसंत मुळे, मिलींद कवाने, सुरेश वाढे, बाबासाहेब वाहुळे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, बाबुराव इंगोले, काळुराम मोरे, शिवाजी पाईकराव, रामकिशन घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबदारी घेत रेल्वे पोलीस, जीआरपी, तसेच हिंगोली शहर ठाणेतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला.