बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:31+5:302021-02-05T07:51:31+5:30
हिंगोली: चालत्या रेल्वेखाली येऊन मृत पावलेल्या बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस कसोसीने प्रयत्न करतात, परंतु हा शोध ...
हिंगोली: चालत्या रेल्वेखाली येऊन मृत पावलेल्या बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस कसोसीने प्रयत्न करतात, परंतु हा शोध घेतेवेळेस मात्र त्यांची चांगलीच दमछाक होते.
हिंगोली जिल्हा रेल्वे पोलीस चौकी अंतर्गत वसमत, पांगरा शिंदे, बोल्डा, शिरळा, धामणी, कंजारा, चोंडी, जुनूना, माळसेलू, नवलगाव, कन्हेरगाव आदी जवळपास १५ छोटे स्टेशन येतात. या दरम्यान, बेवारस मृतदेह आढळल्यास हिंगोली रेल्वे पोलीस चौकीतील पोलिसांना त्याची सूचना केली जाते. यानंतर, हिंगोली रेल्वे पोलीस बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी कसोसीने प्रयत्न करतात, परंतु बहुतांश वेळा त्यांची चांगलीच दमछाक होते. प्रारंभी मृतदेह आढल्यानंतर अनोळखी मृतदेह म्हणून त्याची नोंद रजिस्टरला केली जाते. सापडलेला मृतदेह नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला जातो. तेथे दोन दिवस मृतदेह ठेवल्यानंतर कोणी नातेवाईक आला नाही, तर मृतदेहास सार्वजनिक स्मशानभूमीत पुरले जाते.
हिंगोली रेल्वे पोलीस चौकी अंतर्गत २०१९ मध्ये ५ मृतदेह सापडले होते. त्यापैकी २ मृतदेहाची ओळख पटली. २०२० मध्ये ३ मृतदेह आढळले होते. यापैकी २ मृतदेहांची ओळख पटली. २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये झालेल्या अपघातात ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नांदेडट पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस उपनिरक्षक सोपान भाईक यांच्या मार्गदर्शदर्शनाखाली हिंगोली रेल्वे पोलीस चौकीमध्ये अंकुश बांगर, गणेश जाधव, सुनील घुगे, रवी राठोड आदी कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी, तसेच नातेवाइकांचा शोध करण्यासाठी पाठविले जात, परंतु बहुतांश वेळा नातेवाइकांचा शोध न लागल्यामुळे निराश होऊन परतावे लागते. यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक होते.
३ जणांची ओळख पटली नाही
२०१९ मध्ये ५ मृतदेह सापडले होेते, तर २०२० मध्ये ३ मृतदेह सापडले होते. पोलीस उपनिरीक्षक भाईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कार्य सुरू केले, परंतु अखेरपर्यत तीन मृतदेहांची ओळख मात्र पटली नाही. रेल्वे पोलीस नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात भरपूर अडचणी येत असल्यामुळे बेवारस नातेवाइकांचा शोध लागू शकत नाही, असे रेल्वे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
प्रतिक्रिया
रेल्वे हे सर्वात मोठे प्रवासाचे साधन आहे. रेल्वे प्रवास करतेवेळेस सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तेव्हा आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आपल्या आप्तेष्टांजवळ काहीतरी ओळख ठेवून सर्वानी सुखकर असा प्रवास करावा. जेणेकरून काही अडचण आल्यास किंवा काही अपघात झाल्यास रेल्वे पोलिसांना शोध घेण्यासाठी सोयीचे होईल.
सोपान भाईके, पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, नांदेड
२०१९ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू
०५
२०२० मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू
०३
२०१९
नन