येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 6, 2022 04:46 PM2022-09-06T16:46:26+5:302022-09-06T16:47:14+5:30

वारे सुटून विजांचा कडकटाट होऊ शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाचा अंदाज

Rain with lightning in next three days in Marathwada | येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

googlenewsNext

हिंगोली: मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वारेही वाहू लागेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.

७ सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात, ८ सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तर ९ सप्टेंबर रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वारे सुटून विजांचा कडकटाट होऊ शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तविला आहे.
 

Web Title: Rain with lightning in next three days in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.