हिंगोली जिल्ह्यात पाऊस परतला ; शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:48+5:302021-07-09T04:19:48+5:30
सेनगावात बुधवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ही रिमझिम पाऊस सुरू होता. तालुक्यातील कहाकर पुसेगाव गोरेगाव आजेगाव या ...
सेनगावात बुधवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ही रिमझिम पाऊस सुरू होता. तालुक्यातील कहाकर पुसेगाव गोरेगाव आजेगाव या परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
कळमनुरी तालुक्यातही पहाटे दोन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. तालुक्यातील दांडेगाव, नांदापूर, बाळापूर, डोंगरकडा वाकोडी या परिसरातही चांगला पाऊस झाला,
हिंगोलीत बुधवारी रात्री ११ वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती, गुरूवारी सकाळी हिंगोली शहरासह परिसरातील विविध भागात चांगला पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. औंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री ११ ते १२ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. सदर पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा असल्याने याचा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अजूनही हा पाऊस सुरू आहे. येळेगाव सोळुंके जवळा बाजार परिसरातील पाऊस झाला. वसमत तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय हिंगोली २८, कळमनुरी२८, वसमत २४, औंढा १२, सेनगाव २५ मिलीमीटर अशी नोंद झाली आहे.
मंडळनिहाय पर्जन्य
हिंगोली तालुक्यात हिंगोली ३३.५ मिमी, नर्सी ०.३ मिमी, सिरसम ११.८ मिमी, बासंबा ५९.३ मिमी, डिग्रस कऱ्हाळे ५९ मिमी, माळहिवरा १४ मिमी, खांबाळा १४.३ मिमी, कळमनुरी ५३.५ मिमी, वाकोडी २९ मिमी, नांदापूर २७.८ मिमी, बाळापूर ० मिमी, डोंगरकडा २७.८ मिमी, वारंगा २८.५ वसमत ३६ मिमी, आंबा २३.४ मिमी, हयातनगर २३.४ मिमी, गिरगाव ५ मिमी, हट्टा ३५.५ मिमी, टेंभूर्णी २८ मिमी, कुरुंदा १२.५ मिमी, औंढा २४.५ मिमी, येहळेगाव १.५ मिमी, साळणा ९ मिमी, जवळा बा. १२.३ मिमी, सेनगाव ४० मिमी, गोरेगाव २४.५ मिमी, आजेगाव ३५.३ मिमी, साखरा २४.५ मिमी, पानकनेरगाव १७.८ मिमी, हत्ता ४.८ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.