राम कदमांचा राजीनामा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:29 PM2018-09-28T23:29:43+5:302018-09-28T23:30:00+5:30

भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले.

 Ram Kadam should resign | राम कदमांचा राजीनामा घ्यावा

राम कदमांचा राजीनामा घ्यावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले.
विविध ठिकाणी युवती मेळावे घेतल्यानंतर हिंगालीत विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राम कदमच नव्हे, तर स्त्री असूनही कदमांचे समर्थन करणाºया पंकजा मुंढे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. लोकनेते, निष्कलंक चारित्र्याचे नेते म्हणून आर.आर. पाटील हे विरोधकांनाही मान्य होते. मात्र त्यांच्या एका व्यक्तव्याची मोडतोड करून राजीनामा घेणारे आता गप्प का? बेटी बचाव, बेटी पढावऐवजी बेटी भगाव हा यांचा नारा झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर कुठे आहेत? राज्यात दररोज बलात्काराच्या घडना घडत आहेत. आता त्या का बोलत नाहीत? हिंगोलीतील मुलींनीही आज टुकार मुलांमुळे शिक्षणास मुकण्याची वेळ आल्याचे सांगितले. माझ्या शेतातील दोन आंबे खाल्ल्याने मुल होते, असे म्हणणाºया संभाजी भिडेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदर्श पुरुष म्हणतात. अंद्धश्रद्धेला खतपाणी घालणाºया व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत असलेल्या फडणवीस यांनी गृहखात्याचा राजीनामा दिला पाहिजे. या खात्याला स्वतंत्र मंत्री नेमला पाहिजे. केंद्रात सैराट व राज्यात झिंगाट कारभार चालू आहे. शेतीमालाला भाव नाही. शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत. दुष्काळातही मर्जितल्या विमा कंपन्यांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रत्नमाला चव्हाण, अनिता सूर्यतळ, मालती कोरडे, जावेद राज, सुजय देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title:  Ram Kadam should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.