रानडुकराच्या हल्ल्यात दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:36 AM2018-05-28T00:36:49+5:302018-05-28T00:36:49+5:30
येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डिग्रस क-हाळे : येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली.
गोविंदा विश्वनाथ कºहाळे, सोपान नामदेव कºहाळे असे जखमींची नावे आहेत. गोविंदा कºहाळे हे घरामध्ये झोपलेले असताना, एक पिसाळलेले रानडुक्कर त्यांच्या घरात जोराने धावत आले व कºहाळे यांच्या अंगावर तुटून पडले. त्यांच्या हाता, पायाला चावा घेतला. कºहाळे यांनी आरडाओरड केल्याने रानडुकराने तेथून पळ काढला सध्या जंगली भागात कुठेही पाणी नसल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
हा देखील प्रकार असाच झाला. पाण्याच्या शोधात आलेले रानडुकर गावाजवळ आल्याने गावकरी घाबरुन गेले. गोविंदा कºहाळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे हलविले आहे.