नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:16 AM2018-08-21T01:16:55+5:302018-08-21T01:17:21+5:30

बारा जोतिर्लिंगापैकी आठवे जोर्तिलिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर पडणाऱ्या श्रावण सरीत सुमारे दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.

 Range for Nagnath's darshan | नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा

नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : बारा जोतिर्लिंगापैकी आठवे जोर्तिलिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर पडणाऱ्या श्रावण सरीत सुमारे दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.
सोमवरी रात्री पाऊस असतानादेखील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. दुचाकींनी वाहनतळ खचून भरले होते . रात्री २ वाजता विश्वस्त डॉ. किशन लखमावर, रमेशचंद्र बगडिया, डॉ. पुरुषोत्तम देव यांनी महापूजा केल्यानंतर भाविकांसाठी दरवाजे उघडण्यात आले. पाऊस सुरु असतानाही दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी मात्र कमी होत नव्हती. मध्य प्रदेश, गुजरात, आंंध्र प्रदेश, दिल्ली, तेलंगणा आदी राज्यातील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी दोन दिवस कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या गर्दीने सभामंडप गजबजून गेले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विश्वस्त विद्याताई पवार, गणेश देशमुख, मुंजाभाऊ मगर, वैजनाथ पवार, शंकर काळे उपस्थित होते.

Web Title:  Range for Nagnath's darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.