पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:22 AM2018-06-05T00:22:43+5:302018-06-05T00:22:43+5:30

पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 Range for peak crops; To increase the percentage | पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीचा अजूनही काही थांगपत्ता लागत नाही. शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्षात २१६ कोटी रुपये जमा झाल्याची शासन आकडेवारी कितपत खरी, हे कळायला मार्ग नाही. अनेक शेतकºयांची नावे यादीत नावेच नाहीत. पहिल्या यादीत होती, आता नाहीत, अशा एका ना अनेक तक्रारी आहेत.
त्यांचे निवारण करणारी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. गोपनियतेच्या नावाखाली अग्रणी बँक तर जणू देशाचा सुरक्षा विभाग सांभाळत असल्यागत वागत आहे. त्यामुळे कर्जमाफी व पीककर्ज या दोन्हीही विषयांवरून यंदा शेतकरी भविष्यात अधिक आक्रमक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पीककर्जासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दर आठवड्याला बैठक घेत कर्जवाटप न करणाºया बँकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला. मात्र त्यांच्यासमोर माना डोलवायचे काम करणारे अधिकारी प्रत्यक्षात पीककर्जाच्या संचिकांना हातही लावत नसल्याचे चित्र होते. आता पावसाचेच आगमन झाल्याने शेतकºयांना बँकेतून हाकलता येत नाही म्हणून अर्ज भरून घेतले जात आहेत. यापूर्वी तर अर्जच भरून घेतला जात नव्हता.
सध्याच हजार कोटींपैकी अवघ्या २१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. यावरून बँकांची मानसिकताच स्पष्ट होते. त्यातच अग्रणी बँकेचे कुचकामी धोरण या बँकांनाच पोषक ठरत असून बळीराजाला मात्र कोणी वालीच उरला नाही.

Web Title:  Range for peak crops; To increase the percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.