सेनगावात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 07:23 PM2018-09-15T19:23:51+5:302018-09-15T19:24:42+5:30
भंडारी येथील रेशन दुकानातुन काळा बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य ग्रामस्थानी शुक्रवारी रात्री गावातच रस्त्यावर पकडले.
सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील भंडारी येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास काळ्याबाजारात रेशनचे धान्य विक्री करीता घेवून जाणारे वाहन रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी रेशन दुकानदासह अन्य तिन जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारी येथील रेशन दुकानातुन काळा बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य ग्रामस्थानी शुक्रवारी रात्री गावातच रस्त्यावर पकडले. एम.एच.२३-ई ६७१२ या जि.प सह एका मोटारसायकल वर गव्हाचे एकुण २४ कट्टे ज्याचे वजन तेरा क्विंटल असणारा धान्य साठा घेवुन जात असल्याची माहिती सेनगाव पोलीसाना देण्यात आली.सेनगाव पोलीस ठाण्याचा पथकाने घटनास्थळी जावून दोन वाहनासह धान्य साठा जप्त करीत दोन आरोपीना ताब्यात घेतले.
या प्रकरणी एकुण ३७ हजार रुपायाचा धान्या सह एकुण दोन लाख सात हजार रुपायाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.या प्रकरणी फौजदार वंदना विरणक यांच्या फिर्यादीवरून रेशन दुकानदार डिंगाबर राठोड रा.भंडारी, शेख जमिल शेख जमु रा.रिसोड ,शेख बिबन शेख बुबन ,शेख बिबन शेख बुबन रा .चिंचाबाभर ता.रिसोड या चार आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्या अर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर करीत आहेत.