कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच मोबाईल ॲप्स विरुद्ध आरबीआयचा सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:39+5:302021-01-14T04:25:39+5:30

आरबीआयकडे पंजीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडून ...

RBI warns against lending unauthorized digital platform mobile apps | कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच मोबाईल ॲप्स विरुद्ध आरबीआयचा सावधानतेचा इशारा

कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच मोबाईल ॲप्स विरुद्ध आरबीआयचा सावधानतेचा इशारा

Next

आरबीआयकडे पंजीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करू शकतात. जनतेला येथे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी अशा बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन मोबाईल ॲप्सद्वारा कर्जे देऊ करणाऱ्या कंपन्या संस्थांचा खरेपणा पूर्वतिहास पडताळून पाहावा. याशिवाय, ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या अनधिकृत ॲप्सबरोबर कधीही शेअर करू नयेत किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा https://sachet.rbi.org.in उपयोग करावा. आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुद्धच्या तक्रारी दाखल करण्यासाठीचे पोर्टल, https://cms.rbi.org.in. मार्फत ॲक्सेस केले जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दायाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: RBI warns against lending unauthorized digital platform mobile apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.