यांत्रिकीकरणासाठी ७१ लाखांचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:03 AM2019-01-18T00:03:19+5:302019-01-18T00:03:43+5:30

उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षाच्या यांत्रिकीकरणासाठी तालुक्याला ७१ लाखांचा निधी प्राप्त झाला असून याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी दिली.

 Receive over 71 lakh funds for mechanical engineering | यांत्रिकीकरणासाठी ७१ लाखांचा निधी प्राप्त

यांत्रिकीकरणासाठी ७१ लाखांचा निधी प्राप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षाच्या यांत्रिकीकरणासाठी तालुक्याला ७१ लाखांचा निधी प्राप्त झाला असून याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी दिली.
या कार्यालयात यांत्रिकी-करणांतर्गत ट्रॅक्टरसाठी ५४७, औजारासाठी ५७५, पाईप-२११, विद्युत मोटार-२४४ असे एकूण १५७७ शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ट्रॅक्टरसाठी १५, औजारासाठी ५७५, पाईप २११, विद्युत मोटार १५० असे एकूण ९५१ शेतकºयांना या औजारांच्या खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. ७१ लाखांचा निधी या खरेदीसाठी वापरला जाणार आहे. शेती औजारे खरेदीसाठी पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकºयांनी १५ दिवसाच्या आत नियमानुसार ट्रॅक्टर, औजारे, पाईप विद्युत मोटार खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव मंडळ कृषी अधिकाºयांकडे सादर करावा. प्रस्ताव सादरसाठी विलंब झाल्यास लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करून पुढील पात्र शेतकºयांना खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात येणार आहे. शेतकºयांना १७ जानेवारी रोजी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांना ट्रॅक्टरचे वाटप पोत्रा येथील सरपंच ज्योती रणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ता. कृषी अधिकारी कल्याणपाड, प्रकाश पल्लेवाड, म. रहीम, योगेश पतंगे, प्रकाश पाटील, अजय सुगावे आदी हजर होते.

Web Title:  Receive over 71 lakh funds for mechanical engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.