तीस दिवसांत १० कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:23 AM2018-03-31T00:23:32+5:302018-03-31T00:23:32+5:30
घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ लाख रूपये वसूल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ लाख रूपये वसूल केले.
हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे जवळपास १ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. शिवाय अनेक ग्राहकांकडे थकीत रक्कम असल्याने महाविरणने मार्च एण्डच्या पार्श्वभूमिवर वसुलीसाठी कंबर कसली होती. हजारो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला. जे वीज बिलभरणा करण्यास वारंवार टाळाटाळ करत आहेत अशांची तर चक्क महावितरणने यादीच तयार केली होती. मार्चअखेर नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांकडील ७१ कोटी ७ लाखांची वसुलीचे मोठे आव्हान महावितरण पुढे आहे. वीजबील न भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ३१ मार्च बिल भरण्याची शेवटची तारिख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त थकीत वीजबिल ग्राहकांनी महावितरण कार्यालयात बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ग्राहकांकडे थकीत बिल असेल तर त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशा सूचनाही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत.
उपक्रम : वीजबिल भरणा; शेवटचा दिवस
महावितरणने वीजबिल भरणासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शिवाय संबधित ग्राहकास टप्या-टप्याने बिल भरण्यास सुटही दिली. विशेष म्हणजे नांदेड परिमंडळातील अधिका-यांनी थकीत वीजबिल वसूलीसाठी उपाय-योजना करून पथक नेमले होते. त्यामुळे वसूली मोहिमेस गती आली.
वीजबिल पत्यावरील पत्त्यांची दुरूस्ती मोहिम, वक्रांगी केंद्राची सुविधा, मोबाईल क्रमांक नोंदणी. विशेष म्हणजे महावितरणच्या थकबाकी वसूली मोहिम अधिक गतीमानसाठी प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाºयांकडून फेरतपासणी करण्यात आली.
९ मार्च रोजी एका दिवसात हिंगोली जिल्ह्यातील २९५ वीज ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करून ५७४ ग्राहकांकडून १ कोटी १२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती.