चुकारे मिळाले नसले तरी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:52 PM2018-01-06T23:52:34+5:302018-01-06T23:52:46+5:30
येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.
खरेदी-विक्री संघाकडे माल विक्री करण्यासाठी ४ हजारांवर शेतक-यांची नोंदणी झाली होती. मात्र खरेदी केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्यांंपैकी अनेक शेतकºयांनी खाजगी बाजारात शेतीमालाची विक्री केली. येथे मूग १ हजार ५९२ , उडीद ३ हजार ८२०.५० आणि सोयाबीन ४३२. ५० क्विंटल खरेदी केली आहे. अजूनही शेतकºयांच्या हाती चुकारे पडलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या ठिकाणी झालेल्या अंतर्गत वादामुळे शेतकºयांची मोठी हेळसांड झाली आहे.
या ठिकाणी मुक्काम करुन व उपाशीपोटी राहून तुरीची विक्री केली होती. त्यांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. गोंधळ झाल्यानंतर खरेदी कृउबाकडे सोपविण्यात आली होती. परंतु चुकारे मिळालेले नसले तरीही या ठिकाणी तुरीची नवीन नोंदणी सुरु केली आहे. येथे आतापर्यंत १२०० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंदणी झाली आहे. येथे चकरा मारुन शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षीच तूर खरेदी करताना मोठे राजकारण झाले होते. ते अजूनही मिटलेले नसल्याने, तूर विक्री केलेल्या शेतकºयांच्या हाती तूर विक्रीचे धनादेश पडलेला नाही. त्यामुळे यावर्षी
तूर विक्री करण्यासाठी शेतकरी पेचात सापडले आहेत. यंदाही वातावरणातील बदलामुळे क्विंटलाच्या ठिकाणी किलोने मोजण्याइतकीच तूर शेतकºयांच्या पदरात पडत आहेत. ती विकण्यासाठी शेतकºयांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.
मागील वर्षी मोठा त्रास सहन करून विक्री केलेल्या तुरीचे चुकारे वेळीच देण्याची मागणी शेतकºयांच्या वतीने केली जात असली तरीही त्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.