नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:15+5:302021-09-24T04:35:15+5:30

हिंगोली : हाऊस इंडेक्स वाढणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, तसेच नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे व दूषित पाणी साठे आढळून ...

Regular entomological survey should be done | नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे

नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे

googlenewsNext

हिंगोली : हाऊस इंडेक्स वाढणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, तसेच नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे व दूषित पाणी साठे आढळून आल्यास त्यामध्ये अँबेटिंग करण्यात यावी. साचलेली पाण्याची डबकी, तुंबलेल्या नाल्या, टायर्समध्ये जळके ऑईल, रॉकेल टाकावे, अशा सूचना औरंगाबाद विभागाचे आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. डी. बी. घोलप यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रास २३ सप्टेंबर रोजी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. गुरुवारी त्यांनी सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान, कवठा, रिधोरा आदी उपकेंद्रास भेटी देत कोविड हेल्थ सेंटर, गप्पी मासे पैदास केंद्राची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खरबळ, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, औषध निर्माण अधिकारी देवकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भालेराव, आरोग्य अधिकारी डॉ. धामणे, वैद्यकीय अधिकारी बगाटे, आरोग्य सहाय्यक ठोंबरे, मारोतराव पोले, सुनील मुन्नेश्वर, पडघण, मल्हारी चौफाडे, केशवराव घुगे, शार्दुल, आरोग्य सेविका मोरे, धाबे, आरोग्य कर्मचारी कोरडे, आरोग्य सेविका आलोने आदींची उपस्थिती होती.

Web Title: Regular entomological survey should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.