आरटीओंच्या दुर्लक्षानेच नियमभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:10 AM2018-01-17T00:10:33+5:302018-01-17T00:10:36+5:30
वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.
वसमत तालुक्यात विना क्रमांकाच्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. दुचाकीची संख्या तर भरमसाठ आहे. ट्रॅक्टरट्रॉली, टेम्पो सारख्या जड वाहनांवरही क्रमांक नाहीत. या प्रकाराने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही त्यामुळे भीती राहिली नाही. वसमत तालुक्यात एरवी आरटीओच्या वतीने अशा वाहनांवर कारवाई झाल्याची घटना ऐकिवातही नाही. त्यामुळे कारवाईच होणार नाही तर मग खर्च कशाला करायचा, असा सरळ हिशोबच कित्येक वाहनधारकांचा आहे.
आरटीओचे पथक अधूनमधून कधी आले तर अशा वाहनचालक व धारकांवर वचक राहतो. मात्र वसमत तालुक्यात आरटीओचेच दर्शन होत नाही. जर आरटीओंनी कारवाई केली असते तर जीर्ण व जर्जर झालेली वाहने, धोकादायक पद्धतीने होणारी जड वाहतूक, विना क्रमांकाची वाहने यांच्यावर काही प्रमाणात तरी अंकुश राहिला असता; परंतु आरटीओच्या दुर्लक्षाने रान मोकळे झाल्यासारखी अवस्था आहे.